घर फोडले,तब्बल साडेचार लाख रुपयाचा‌ मुद्देमाल लंपास

0
10



जत,संकेत टाइम्स : जत शहरातील मध्यवर्ती भागातील मनगुळी प्लॉटमध्ये खतीब शोरूम जवळ राहणारे मल्लिकार्जुन रुद्राप्पा होकांडी (रा.तावशी,ता.अथणी सध्या रा.मनगुळी प्लॉट जत)यांच्या घरी कोण नसल्याच्या फायदा घेत अज्ञात चोरट्यांने घर फोडत 4 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.





याबाबतची अधिक माहिती अशी की,मल्लिकार्जुन होकांडी यांच्या पत्नीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांना त्यांच्या गावी नेहण्यात आले होते.मल्लिकार्जुन व ‌मुलेही तिकडे गेले होते.त्यामुळे घर बंद होते.घरी कोण नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करत कपाटातील 2 लाख 40 हजार रुपये किंमतीचे सहा तोळ्यांचे घंटन,40 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा टिक्का,40 हजार रुपये किंमतीच्या 2 सोन्याचा अंगठ्या,40 हजार रुपये किंमतीची एक तोळ्यांची चैन,1 लाख 60 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या व रोख रक्कम 10 हजार रुपये असा एकूण 5 लाख 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला आहे.





या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले,पोलीस निरीक्षक 

आप्पासाहेब कोळी,पोलीस उपनिरीक्षक महेश मोहिते,पोलीस उपनिरीक्षक घोडके यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.या घटनेची फिर्याद मल्लिकार्जुन रुद्राप्पा होकांडी यांनी जत पोलीस ठाण्यात दिली आहे.अधिक तपास जत पोलीस करत आहे.दरम्यान पोलीसांनी श्वान पथकाचे घटनास्थळी पाचारण केले होते.मात्र काही अंतरावर श्वान घुटमळले.अधिक तपास पो.नि.आप्पासाहेब कोळी करत आहेत.




जत येथील मल्लिकार्जुन रुद्राप्पा होकांडी यांचे घर फोडून असे साहित्य चोरट्याने विस्कटले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here