कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य आभियांत्रिकी डिप्लोमा, बी.ई. आणि बी. टेक इंजिनिअरिंग, आयटीआय,शासन मान्य अल्प मुदतीचे अभ्यसक्रम प्रवेश प्रकिया २०२४-२०२५ सामायिक प्रवेश परीक्षा सीईटी अंतर्गत प्रथम वर्ष आभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी कॅप राऊंड-१ साठी ऑप्शन फॉर्म कसा भरावा, विविध शासकीय शिष्यवृत्ती योजना, करिअरची योग्य दिशा या विषयावर इंजिनिअरिंगला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांसाठी विशेष करिअर मार्गदर्शन शिबाराचे आयोजन करण्यात आले होते. त्या शिबारास कोल्हपुर, सांगली, सातारा जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्तीतराहून प्रतिसाद नोंदविला. कार्यक्रमाचे उद्घाटन संजय घोडावत विद्यापीठाचे, विश्वस्त विनायक भोसले, उपस्थित पालकापैकी एक प्रतिनिधी पालक, विशेष करिअर मार्गदर्शन शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक, प्राचार्य डॉ. विराट गिरी, यांनी दीप प्रज्वलन केले.
पालकांना व विद्यार्थांना मार्गदर्शन करताना विश्वस्त, विनायक भोसले म्हणाले करिअरची दिशा निवड करताना दिशा योग्य असेल तर जीवनाची दशा होत नाही. क्षेत्र निवडताना आपली आवड निवड पालकांचे सहकार्य आणि मार्गदर्शकांचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे असते. जे करिअर निवडायचे आहे. तो मुख्य गोल धरून त्यासाठी हार्ड-वर्क आणि स्मार्ट-वर्क सातत्याने केल्यास सक्सेस नक्कीच मिळत असतो. त्यांनी तीन सी, तीन बी सांगून उपस्थित विद्यार्थी आणि पालकांची माने जिंकले.
विशेष करिअर मार्गदर्शन शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक, प्राचार्य डॉ. विराट गिरी यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करताना नवीन एज्युकेशन पॉलिसी महत्त्व उपयोग आणि विद्यार्थी व पालकांना असणारे फायदे, जगात निर्माण होत असलेली नवनवीन टेक्नॉलॉजी आणि त्या टेक्नॉलॉजीला सक्षम निर्माण होणारे इंजिनीयरची शैक्षणिक आणि बौद्धिक पात्रता, इंजीनियरिंग क्षेत्रातील नवनवीन बदल आणि पुढील अहवाने, इंजीनियरिंग क्षेत्रातील करिअरचे विविध क्षेत्र त्यात मी कुठे, सीईटी निकाल प्राप्त झालेले गुण आणि त्यावर प्रवेश प्रक्रिया नियोजन आणि नियमावली या विषयावर सखोल मार्गदर्शन करून विविध उदाहरणे स्पष्टीकरण करून विद्यार्थी व पालकांना मंत्रमुग्ध केले. पालक आणि विद्यार्थांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना डॉ. गिरी यांनी उत्तम मार्गदर्शन करून उत्तरे दिली.
मार्गदर्शन कार्यक्रमाला संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे सर्व विभाग प्रमुख, प्रवेश प्रक्रियेतील मार्गदर्शक प्राध्यापक, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. आर. पाटील, कार्यक्रमाचे आभार डिग्री प्रथम वर्ष विभाग प्रमुख, प्रा. स्वप्निल थिकने यांनी मानले.संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष, संजयजी घोडावत, विश्वस्त श्री. विनायक भोसले यांनी पालकांना आणि विद्यार्थांना त्यांच्या करिअरसाठी शुभेच्छा दिल्या.