पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे, आशिष गुरव यांच्या करिअर मार्गदर्शनाचे आयोजन | जिल्हाधिकारी अमोल येडगे व कार्तिकीएन एस. यांची उपस्थिती

0

अतिग्रे: संजय घोडावत रेसिडेन्सील अकॅडमी (SGRA) च्या वतीने 12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 17 जून 2024 रोजी शाहू स्मारक भवन, दसरा चौक कोल्हापूर येथे करियर मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी सरदार नाळे पोलीस उपाधीक्षक लाच लचपत प्रतिबंध विभाग, कोल्हापूर व आशिष गुरव करियर मार्गदर्शन करणार आहेत.यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकीएन एस. उपस्थित राहणार आहेत.

 

Rate Card

2021 पासून बीए,बीकॉम,बीएससी पदवी सोबतच यूपीएससी,एमपीएससी, बँकिंग, एसएससी ची तयारी आणि मार्गदर्शन या अकॅडमी द्वारे दिले जाते. कोल्हापूर शहरातील व ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांनी या व्याख्यानास उपस्थित राहावे व करिअर विषयी माहिती घ्यावी असे आवाहन अकॅडमीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.