झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणजेच तळपत्या सुर्याचा प्रकाश

0

आज इतिहासातच नाही तर जगात झाशीची राणी लक्ष्मीबाईचे नाव मोठ्या स्वाभिमानाने घेतल्या जाते. कारण कमी वयात देशासाठी लढा उभारून इंग्रजांशी दोन-दोन हात करून संघर्ष केला यात लक्ष्मीबाईची महानता अजरामर आहे.झाशीची राणी लक्ष्मीबाईचा जन्म मोरोपंत तांबे आणि भागीरथीबाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी(वाराणसी )येथे १९नोव्हेंबर १८३५ ला झाला. लक्ष्मीबाईचे मुळ नाव मणिकर्णिका होते. लक्ष्मीबाईचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते.मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील गुढे गावचे होते.नंतर काशी येथे स्थायी झाले व तिथे लक्ष्मीबाईंचा जन्म झाला. उत्तर भारतातील झाशी राज्यातील महाराज गंगाधरराव नेवलेकर यांच्याशी १९ में १८४२ ला विवाह झाला आणि लक्ष्मीबाई झाशीची राणी बनली.परंतु २१ नोव्हेंबर १८५३ रोजी महाराज गंगाधरराव नेवलेकर यांचे निधन झाले तेव्हा राणी अवघ्या १८ वर्षांच्या होत्या.तथापि राणीने आपला संयम आणि धैर्य राखले आणि बाळ दामोदरच्या लहान वयामुळे राणी लक्ष्मीबाईने राज्याचा ताबा घेतला. लक्ष्मीबाई एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या महाराणी होत्या.

 

१८५७ च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरूध्द झालेल्या स्वातंत्र्य उठावातील एक अग्रगण्य तेजस्वी, महाप्रतापी आणि कमी वयातील बहादुर सेनानी होत्या.७ मार्च १८५४ रोजी ब्रिटिश सरकारने झाशीला ब्रिटिश साम्राज्यात सामील होण्याचे आदेश देणारे अधिकृत राजपत्र जारी केले.ब्रिटीश अधिकारी ॲलिसचा हा आदेश राणी लक्ष्मीबाईने ऐकल्यावर तळ पायाची आग मस्तकात गेली व आदेश पाळण्यास नकार दिला आणि “मी झाशी देणार नाही” असे जाहीर केले व झाशी हे बंडाचे केंद्र बनले.सर ह्यु रोज यांनी २२ मे १८५८ रोजी काल्पीवर हल्ला केला.परंतु राणी लक्ष्मीबाईने आपल्या पराक्रमाने ब्रिटिशांना पराभूत केले. यामुळे ब्रिटिश तिलमीला झाले व पुन्हा काल्पीवर हल्ला केला आणि राणीचा पराभव झाला.या पराभवानंतर रावसाहेब पेशवे,बांद्याचे नवाब, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई आणि इतर महत्वाचे सैनिक गोपाळपूरला जमले.यावेळी राणीने ग्वाल्हेर ताब्यात घेण्याचा सल्ला दिला. लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे यांनी बंडखोर सैन्यासह ग्वाल्हेरवर कूच केले व ग्वाल्हेरचा किल्ला काबीज केला आणि ग्वाल्हेरचे राज्य पेशव्यांच्या ताब्यात दिले.१८५७ चा उठाव हा संपूर्ण हिंदुस्थानात झाला. त्याचप्रमाणे ५ जून १८५७ ला झाशीतही शिपायांचा उद्रेक झाला व केवळ ३५ शिपायांनी इंग्रजांना पळवून सोडले.२२ में १८५८च्या कल्पीच्या लढाईनंतर  राणी ३०-३१ मे १८५८ रोजी ग्वाल्हेरला आल्या.तेथे स्वस्त न बसता लक्ष्मीबाईंनी आपल्या सैन्याची कवायत नियमित सुरू ठेवली. इंग्रजांना रोखण्यासाठी कशा प्रकारे मोर्चे बांधणी करावी या विषयी त्यांनी चर्चा केली.

 

 

अचानक याचवेळी १७ जून १८५८  रोजी ब्रिटिश अधिकारी स्मिथ सैन्यासह ग्वाल्हेरच्या अगदी जवळ “कोटा की सराय” येथे येऊन पोहोचला व त्यांने त्वरित हल्ला चढवला.अशा परिस्थितीत लक्ष्मीबाईने रणांगणात धाव घेतली आणि लक्ष्मीबाईने ब्रिटिश शिपायांना तलवारीने सपासप कापत सामोरं जात होत्या.विजेसारख्या तळपणाऱ्या राणीकडे पाहून त्यांच्या सैनिकांमध्ये आणखी जोश आला व ब्रिटिश सैन्याला छाटुन काढले.अशा परिस्थितीत इंग्रज अधिकारी स्मिथचे सैन्य मागे हटणार होते.परंतु घात झाला आणि नव्या दमाची एक फौज बाजूच्या टेकडीवरून चालून आली.अशा परिस्थितीत आपला टिकाव लागणार नाही हे पाहुन स्वारांनिशी बाहेर पडल्या.थोडे पुढे जाताच एका ओढ्यापाशी त्यांचा “राजरत्न” नावाचा (हा नवीन घोडा होता) घोडा अडला.नेहमीचा “सारंगी”नावाचा घोडा शेवटच्या लढाईत त्यांच्याबरोबर नव्हता.अशा परिस्थितीत काही केल्या घोडा ओढा ओलांडत नव्हता. इंग्रजांशी लढत असतांना राणी लक्ष्मीबाई रक्तबंबाळ होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या.परंतु पुरूषी वेशात असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना इंग्रज ओळखू शकले नाहीत व इंग्रज पुढे निघून गेले.घायाळ झालेल्या राणी लक्ष्मीबाई यांना सेवक रामचंद्र देशमुखांनी फुलबाग येथील बाबा गंगादास यांच्या मठात आणले.आपला देह इंग्रजांच्या हाती लागू नये अशी त्यांची इच्छा होती.

 

 

Rate Card

फुलबाग येथे बाबा गंगादास यांच्या मठात तात्या टोपे, रामचंद्रराव देशमुख, काशीबाई कुनविन, गुलमोहम्मद, बांदा नवाब बहादुर अली आणि दामोदर राव यांनी मुखाग्नी दिली.अशा प्रकारे महान योध्द्या राणी लक्ष्मीबाई यांनी वीरमरण पत्करून वयाच्या तेविसाव्या वर्षी प्राणज्योत मालवली.राणी लक्ष्मीबाईचा स्वर्गवास १७ जून १८५८ ला झाला.परंतु इंग्रज सरकारने राणी लक्ष्मीबाईना १८ जूनला मृत घोषित केले त्यामुळे दरवर्षी १८ जूनला पुण्यतिथी साजरी करण्यात येते.जोपर्यंत सुर्य-चंद्र, आकाश -पाताळ आहे तोपर्यंत झाशीची राणी लक्ष्मीबाई याचे नाव अमर राहील. देशात झाशीची राणी लक्ष्मीबाई याची प्रेरणा निरंतर आपल्या हृदयात रहावी यासाठी त्यांच्या पुण्यतिथी निमित्त देशात वृक्ष लागवड व्हायला हवी.कारण असे जर झाले तर आपल्याला प्रत्येक झाडाच्या पानांत,फुलात,फळात झाशीची राणी लक्ष्मीबाई याचे दर्शन अवश्य होईल.राणी लक्ष्मीबाईना माझा कोटी कोटी प्रणाम.जय हिंद!

 

रमेश कृष्णराव लांजेवार
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर)
मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.