उमदी, संकेत टाइम्स
जत पूर्वभागातील उमदी परिसरात मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास आकाशातून मोठा आवाज झाला सुमारे पाच ते दहा सेकंदात सलग दोन वेळा आवाज झाला आवाज इतकी प्रकर्षाने जाणवलं की लोकांना जणू काय भूकंप झाला की काय अशी शंका निर्माण झाली
उमदी व उमदी परिसरातील माडग्याळ, उटगी, करजगी, मंगळवेढा तालुक्यातील शीवनगी, सलगर, मरवाड तर उमदी जवळील कर्नाटक राज्यातील चडचण, लोणी बुद्रुक,झळाकी आदी सुमारे 60 ते 70 किलोमिटर परिसरात मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास आकाशातून मोठा आवाज झाला आवाज इतकी प्रकर्षाने जाणवलं की, गावातील अनेकांच्या घरातील भांडी कोसळले तर कांहीं घरातील खिडक्या हलल्या त्यामुळे लोक घरातून बाहेर पडू लागले या आवाजामुळे भूकंप झाल्याचा भास झाल्याने लोक भयभीत झाले होते
दरम्यान अप्पर तहसीलदार सुधाकर माडगे यांनी तातडीने लक्ष घालून सांगलीचे भूजल सर्वेक्षण अधिकाऱ्यांना तातडीने बोलवून उमदी परिसरातील लोकांकडून माहिती घेतली भूजल अधिकारी अमित चीरंगे आणि नदाफ यांनी लोकांबरोबर चर्चा केली यावेळी भूजल सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी या भागातील भूजल पातळी खालविल्याने असा प्रकार घडत असणार अशी शंका व्यक्त केली आणि असा प्रसंग उद्भवल्यास तात्काळ प्रशासनाला कळवावी असे सांगितले
या परिसरातील असा आवाज येणे नवीन नाही मात्र गेली दोन तीन वर्षात चार वेळा असा आवाज झाल्याने लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
मात्र या भागात वारंवार होणाऱ्या आवाजाने भूकंप झाला की भू सुरुंगचा आवाज झाला अशा सतत होणाऱ्या आवाजामुळे लोकांमध्ये घबराट पसरली होती