सुवर्णकाराची फसवणूक;दोघांना पाच दिवसांची कोठडी

0
जत : आटपाडी तालुक्यातील एका सुवर्णकारास सोने देतो, असे सांगून खोटे सोने देऊन १ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली होती. भीमराव निवृत्ती गोंजारी (रा. दिघंची) यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे.याप्रकरणी पोलिसांनी संशयित जेताराम केसाजी राम (रा. दईपुर, ता. राणीवाडा जि. जाल्होर, राजस्थान, सध्या रा. जत) व सरवन मोताजी सोळंकी (रा. सिंद्री, ता. बाळोत्रा, जि. बाळोत्रा, राजस्थान, सध्या रा. जत) या दोघांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.