पुढचा मुख्यमंत्री सांगली जिल्ह्याचा झाला पाहिजे | खासदार विशाल पाटील यांचा एल्गार

0
17

सांगली : राज्यात पुढचं सरकार काँग्रेसचं आणायचं आहे.सांगलीतील वसंतदादांच्या विचारांचा,मुख्यमंत्री झाला पाहिजे असं विधान खासदार विशाल पाटील यांनी केले आहे.तर त्याच कार्यक्रमात सांगलीचा मुख्यमंत्री असेल की नाही माहिती नाही परंतु राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असं आमदार विश्वजित कदम यांनी म्हटले आहे.मिरजेत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हे दोन्ही नेत्यांनी भविष्यातील भूमिका स्पष्ट केली.

यावेळी खासदार विशाल पाटील म्हणाले की,आपण भाजपाचा पराभव करू शकतो, धनशक्तीचा पराभव करू शकतो. या जातीवादी लोकांचा पराभव करू शकतो हे सांगलीने दाखवून दिले आहे.
महाराष्ट्रात आपल्याला काँग्रेसचं सरकार आणायचं आहे.आपण एक झालो आहोत. आपल्याला अहोरात्र एक होऊन काम करायला लागणार आहे. आगामी विधानसभेत सांगली जिल्ह्यातील ४-५ आमदार काँग्रेसचे निवडून देऊ असं आवाहन खासदार विशाल पाटील यांनी केले.
सांगली जिल्ह्यात विकासाच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांना फसवण्यात आले. त्यामुळे येणाऱ्या काळात सर्व ताकदीने मतभेद विसरून आपल्याला एक दिलाने काम करायचे आहे. विशालराव, येणाऱ्या काळात महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळेल. तो सांगली जिल्ह्याचा असेल की नाही हा येणारा काळ ठरवेल पण काँग्रेस पक्षाचा नक्की असेल असा विश्वास आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केला.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here