सांगली : सांगलीत येत्या विधानसभेला पाच आमदार काँग्रेसचे असतील,त्याचबरोबर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल,हे निश्चित आहे,प्रतिपादन माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केले.ते शनिवारी रात्री मिरजेत झालेल्या कॉग्रेसच्या कार्यक्रमात बोलत होते.
सांगलीचे नूतन खासदार विशाल पाटील यांचा मिरज विधानसभा मतदार संघाच्यावतीने भव्य सत्कार करण्यात आला. डॉ.कदम म्हणाले,खासदार विशाल पाटील यांना सर्वाधिक मत्ताधिक्य मिरजेने दिले आहे.आम्ही संघर्षाची लढाई लढलो, ज्या पक्षात आम्ही काम करत होते त्याचे पक्षाचे तिकिट मिळत नव्हते, त्यामुळे अन्याय होत असल्याचे पाहून जनतेनेच या निवडणुकीत साथ दिली.जनतेने काँग्रेस पक्षाला आणि पक्षाच्या विचाराला साथ दिली.मिरज विधानसेभेसाठी कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसचा झेंडा फडकला पाहिजे.