रामपूर हल्ला प्रकरणातील संशयित ताब्यात | स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जत,संकेत टाइम्स : रामपूर (ता.जत) येथील अनुसया लक्ष्मण केंगार (वय 85) या वृध्देवर भावकीतील अल्पवयीन मुलाने किरकोळ वादातून कु-हाडीने हल्ला केला.डोक्यात व दोन्ही हाताच्या बोटांवर वार झाल्याने
अनुसया या गंभीर जखमी झाल्या आहेत. यावेळी जखमी अनुसया यांच्या गळ्यातील 22 हजार रुपयांची अर्धा तोळ्याची सोन्याची बोरमाळही हल्लेखोराने पळवली.
ही घटना शनिवारी रात्री 8 वाजता घडली.दरम्यान संशयित अल्पवयीन मुलाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडले आहे.त्यांने हल्ला केल्याची कबूली पोलीसांना दिली आहे. दरम्यान संशयित आरोपी घटनास्थळी फिरत असतानही जत पोलीसांना तो आढळून आला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
रामपूर येथे अनुसया लक्ष्मण केंगार या मुलगा दयाप्पा लक्ष्मण केंगार यांच्यासोबत राहतात. शनिवारी रात्री दयाप्पा बाहेर गेले होते. त्यामुळे अनुसया घरात एकट्याच होत्या. रात्री 8 वाजता दयाप्पा हे घरी आले असता अनुसया जखमी अवस्थेत बेशुद्ध होऊन पडल्या होत्या. त्यांनी याची अल्पवयीन संशयित ताब्यात माहिती राहुल शिवशरण, गणेश मोनू आठवले,प्रशांत केंगार यांना दिली.

त्यांनी तत्काळ अनुसया यांना उपचारासाठी जत येथील शासकीय
रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सांगलीला हलविण्यात आले.दरम्यान, भावकीतील वादातून घराशेजारी राहणाऱ्या अल्पवयीन तरुणाने हा हल्ला केल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्याने गुन्हा कबूल केला.अनुसया यांची बोरमाळ संशयिताच्या घरात
सापडली. याबाबतची फिर्याद दत्ता सयाप्पा केंगार यांनी जत पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मोहिते करत आहेत.
