जत तालुक्यातील सर्व गावांना मिळणार म्हैसाळचे पाणी | विस्तारित योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची मंगळवारी वर्कऑर्डर* 

0
जत: जत तालुक्यातील एक ही गाव सिंचनापासून वंचित राहणार नाही म्हैसाळ विस्तारित योजनेतून सर्व गावांना पाणी मिळणार आहे दुसऱ्या टप्प्यातील निवेदची निश्चिती व वर्क ऑर्डर मंगळवार दिनांक 2 जुलै रोजी मिळणार असल्याची माहिती भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांनी दिली

 

कृषी दिनानिमित्त जत तालुक्यातील खलाटी येथे शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वाशाण, रामपूर खलाटी, जिरग्याळ, मिरवाड शेतकऱी उपस्थित होते. म्हैसाळ योजना व विस्तारित म्हैसाळ योजनेतअनेक गावे सिंचनापासून वंचित राहणार काय? अशी शंका शेतकऱ्यांच्या मनात होती. त्या शंकेचे निरसन करण्यासाठी म्हैसाळ योजनेचे कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांना बैठकीतस बोलावण्यात आले होते. यावेळी कोरे यांनी विस्तारित म्हैसाळ योजनेची सविस्तर माहिती सांगितली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना रवीपाटील म्हणाले की, जत तालुक्याचा दुष्काळाचा कलंक कायमस्वरूपी पुसून टाकण्याचे काम भाजप महायुती शासनाने केले आहे. विस्तारित म्हैसाळ योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. तर दुसऱ्या टप्प्याची निवेदन निघाली आहे. निविदा निश्चित करण्यासाठी जलसंपदा मंत्रालयामध्ये मंगळवार, २ जुलै रोजी अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत ठेकेदार निश्चित करून वर्कऑर्डर देण्यात येणार आहे.

जत तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांची शंका होती ती काही गावे या योजनेतून वगळण्यात आली आहेत का?  विशेषत:  खलाटी, वाशाण, रामपूर, मिरवाड या गावातील काही भागातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार का? अशी शंका होती. मात्र विस्तारित म्हैसाळ योजनेतून जत तालुक्याचे शंभर टक्के सिंचन होणार आहे.
जत तालुक्यात सुमारे 500 हून अधिक छोटे तलाव तर 26 पाटबंधारे तलाव आहेत. ते सर्व तलाव विस्तारित योजनेतून भरून घेण्यात येणार आहेत. विस्तारित म्हैसाळ योजनेचे एकूण चार कालवे असून या कालव्याच्या माध्यमातून तलावामध्येही पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात संपूर्ण तालुक्याचा कायापालट होणार आहे. जत तालुक्याचा हा कायापालट करण्यामध्ये जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकारचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी पुढाकार घेऊन जत तालुक्याला नंदनवन करण्याचे अभिवचन दिले आहे ‌

 

यावेळी सरपंच परिषदेचे माजी अध्यक्ष बसवराज पाटील, खलाठी गावचे सरपंच ज्ञानेश्वर देवकते, माजी उपसरपंच अशोक जाधव, संभाजी शेजुळ, मेजर राम वाडे,नरेंद्र कोळी, वाशाण गावचे सरपंच प्रकाश पाटील, सुभाष पाटील, जिरग्याळ ग्राम पं सदस्य तानाजी कोरे, राजु कोरे,जितेंद्र कोरे, अजित कोरे, मुकेश बनसोडे, ज्ञानेश्वर तुकाराम देवकते, नागेश कोळी, दिलीप कोळी, विठ्ठल तात्या कोळी, नागेश बनसोडे, उपस्थित होते.
खलाटी ता.जत येथे जलसंपदा अधिकारी व शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.