शेगाव येथे ‌शिवराज्याभिषेक‌ दिनानिमित्त औषध फवारणी

0
5





शेगांव,संकेत टाइम्स : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शेगाव (ता.जत)येथे ओम साई प्रतिष्ठान यांच्या वतीने गावात औषध फवारणी करण्यात आली.

प्रांरभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून शेगाव येथील सुप्रसिद्ध डॉ.संभाजी देशमुख,डॉ.संजय नाईक, डॉ.शिवाजी खिलारे यांच्या हस्ते फवारणीस सुरुवात करण्यात आली.

कोरोनाच्या‌ पार्श्वभूमीवर साई प्रतिष्ठानच्या वतीने गावातील प्रमुख चौक,सार्वजनिक परिसरात औषध ‌फवारणी करून निर्जूंकीकरण करण्यात आले.






यावेळी माजी सरपंच धोंडीराम (गुंडा)माने, रविद्रं पाटील,शेगांवचे माजी उपसरपंच दत्तात्रय निकम,युवा नेते महादेव साळुंखे, दिगंबर निकम,प्रभाकर माने तसेच संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार लवकुमार मुळे,अध्यक्ष समाधान माने, उपाध्यक्ष बबलू शिंदे सचिव जितेंद्र बोराडे, कार्याध्यक्ष सागर बागल, सहसचिव राहुल ताटे, संस्थेचे सदस्य आनंदा किसवे आबासो शिंदे, प्रमोद साळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाला माजी सरपंच धोंडीराम (गुंडा) माने व लतिफ मणेर,विटा येथील अनुराज एजन्सी यांनी सहकार्य केले.


शेगाव ता.जत‌ येथे ‌शिवराज्याभिषेक उत्साहात ‌साजरा करण्यात आला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here