जनकल्याण पदयात्रेत माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील-येतनाळ सहभागी होणार

0
15

बिळूर येथे १ ऑगस्टला जाहीर सभा
जत: जत तालुक्याच्या विविध प्रश्नासाठी तम्मनगौडा रविपाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ऐतिहासिक जनकल्याण संवाद पदयात्रेमध्ये माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील-येतनाळ हे सहभागी होणार आहेत. १ ऑगस्ट रोजी त्यांची बिळूर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती पदयात्रेचे प्रमुख संयोजक निवृत्ती शिंदे सरकार व संखचे नेते जी. आर. पाटील सर यांनी पत्रकारांना दिली.
भाजप जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या जनकल्याण संवाद पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत असून दुसऱ्या दिवशी ही पदयात्रा संख मुक्कामी दाखल झाली. यावेळी पदयात्रेतील प्रमुख नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी पाणी संघर्ष समितीचे नेते सुनील पोतदार, सरपंच परिषदेचे माजी तालुकाध्यक्ष बसवराज पाटील, भाजप युवा मोर्चाचे पिरू कोळी हेही उपस्थित होते.

 

निवृत्ती शिंदे सरकार म्हणाले की, जत तालुक्यातील पहिली ऐतिहासिक पदयात्रा उमदी येथून दिमाखात सुरु झाली आहे. मागील दोन दिवसात या यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या प्रमाणात महिला भगिनी पदयात्रेत सहभागी झाल्या आहेत. या पदयात्रेमध्ये कर्नाटकातील येतनाळचे माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील हे सहभागी होणार आहेत. दि.१ ऑगस्ट रोजी त्यांची बिळूर येथे भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

 

बसवराज पाटील म्हणाले की, तम्मनगौडा  रविपाटील यांनी जत तालुक्यामध्ये नवा इतिहास घडविला आहे. जनतेच्या प्रश्नासाठी संपूर्ण तालुक्यात पदयात्रा करण्याचा ऐतिहासिक उपक्रम त्यांनी सुरू केला आहे. त्याला जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. जनसंवाद पदयात्रेचे गावोगावी प्रचंड स्वागत होत आहे. बिळूर येथे होणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील-येतनाळ यांच्या सभेसाठी पंचक्रोशीतील सर्व माता भगिनी, शेतकरी, युवक व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here