श्रीकांत होवाळे यांचा विवेक कांबळे यांच्याहस्ते सत्कार
माडग्याळ, संकेत टाइम्स : रिपाइंचे जत तालुकाध्यक्ष श्रीकांत होवाळे यांचा वाढदिवस महाराष्ट्र प्रदेश सचिव विवेक कांबळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
विवेक कांबळे म्हणाले,श्रीकांत होवाळे सर अगदी पँथर चळवळीपासून आंबेडकरी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्याचे कार्य करत आहेत.रिपाइंचे विचार व सर्व जाती-धर्मातील जनतेला सोबत घेऊन समता,एकतेची मोट बांधली आहे.फुले,शाहू,आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपताना सरांचा अभिमान वाटतो आहे.
यावेळी कांबळे यांच्याहस्ते कल्पवृक्ष (नारळ)वृक्षाचे रोपण करण्यात आले.
यावेळी रिपाइं आय.टी. सेलचे सांगली जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे,जिल्हा उपाध्यक्ष संजय कांबळे देवनाळकर जत तालुका सरचिटनीस बिरूदेव बाबर,मुस्लिम आघाडीचे शब्बीर नदाफ, राम साळूंखे,दलित महासंघाचे लिंगाप्पा दोड्डमणी, राजू वाघमारे, सुमित कांबळे,विजय कांबळे,पृथ्वीराज रांजणे, होवाळे कुटूंबीय व गावकरी उपस्थित होते.

रिपाइंचे तालुकाध्यक्ष श्रींकात होवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना महाराष्ट्र प्रदेश सचिव विवेक कांबळे व मान्यवर
