जत तालुक्यातील अनेक रस्त्याची चाळण..| उंचवटे देताहेत अपघाताला निमंत्रण
अनेक वेळा वाहनधारकांना खड्ड्यामुळे पाठीचे आजार तसेच उन्हाळ्यात धुळी कणांमुळे श्वसनाचे आजार जडले आहेत. खड्ड्यांचा व उंचवटे यांचा अंदाज न आल्याने अनेकजण घसरून पडण्याचे प्रकारही घडले आहेत.यामध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे.गेल्या पंधरा दिवसात संततधार सुरू असल्याने अनेक खड्ड्यात पाणी साचून धोका वाढत आहे. या रस्त्यावरून नोकरी कामानिमित्त व शाळा कॉलेजला जाणाऱ्या येणाऱ्याची संख्या जास्त आहे.खड्डे चुकवण्याच्या नादात येथे छोटे-मोठे अपघातही घडले आहेत अनेक वेळा येथील नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे रस्ता दुरुस्तीची मागणी केली असून देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे बोलले जा आहे.
रस्त्यावरील उंचवटे हटवा
मुख्य रस्त्यावर विविध प्रकारच्या खुदाईमुळे रस्त्यावरील उंचवटे वाहनधारकांना अपघाताला निमंत्रण देत असून एखादी मोठी घटना घडल्यावर प्रशासनाला जाग येणार का संबंधित प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष घालावे.