मुंबई : विधानसभा निडणूकीचे पडघम वाजत असतानाच सर्व पक्षाकडून तयारी सुरू केली आहे.लोकसभा निवडणुकीत राज्यात मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे.दरम्यान महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांच्या अनेक बैठकाचे सत्र सुरू आहे.निवडणूका जवळ येताच प्रत्येक पक्षाकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यातच आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या १८३ जागा जिंकून येतीलचं, असा दावा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
राज्यात विधानसभेला महायुतीचा पराभव अटळ आहे.लोकसभेला महाविकास आघाडीला सुमारे ६५ टक्के जागा मिळाल्या होत्या.त्या हिशोबाने विधानसभेतही ६५ टक्के म्हणजे हा आकडा एकूण १८३ वर जात आहे.त्यामुळे आमच्या १८३ वर जागा निवडून हे निश्चित आहे.सर्वाधिक जागा महाविकास आघाडीला मिळणार आहेत, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे