बागेवाडी बाळूमामा भंडारा यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

0
13
जत: सालाबादप्रमाणे श्री क्षेत्र बागेवाडी, ता जत येथील जागृत श्री संत सद्गुरू बाळूमामा देवस्थानचा महाभंडारा व वार्षिक यात्रा उत्सव दि. २९ व ३० ऑगस्ट  रोजी आयोजित करण्यात आला आहे.यात्रेस रायलिंगेश्वर संस्थान मठ, उमदी, ककमरीचे श्री गुरूलिंग जंगम स्वामीजी, बालगाव आश्रमचे डॉ अमृतानंद महास्वामी, चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती हभप तुकाराम बाबा महाराज त्यांच्या उपस्थित राहणार आहेत.बागेवाडी येथील श्री संत बाळूमामा यात्रेचे हे १८ वे वर्ष आहे. गुरूवार, दि. २९ ऑगस्ट एकादशी दिवशी सायंकाळी: ७ वाजता: आरती, फराळ वाटप व  रात्री: ८ वाजता हभप श्री. नवनाथ महाराज वाळेखिंडीकर यांचे किर्तन होणार आहे.
शुक्रवार, दि. ३० ऑगस्ट रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे.

 

सकाळी: ७ वाजता- अभिषेक व आरती : सकाळी: 8  वाजता योगाचार्य श्री. बसवराज माळी, जत यांच्याहस्ते रूद्राभिषेक व होम विधी;  सकाळी १० वाजता श्री संत बागडेबाबा, चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती हभप. श्री. तुकाराम बाबा महाराज यांचे काल्याचे किर्तन; दुपारी: १२ वा. पुष्पवृष्टी;  दुपारी: १२: ३० वाजेपासून – महाप्रसाद पालखी उत्सव व पालखी भेटी हा यात्रेच्या कार्यक्रमाचा मुख्य आकर्षणाचा विषय आहे.दुपारी: २ वाजता : पालखी सोहळा ग्राम प्रदक्षिणा प्रारंभ; दुपारी: ३ वाजता: पालखी भेटी सोहळा;  दुपारी: ४ वाजता देवाचे पुजारी श्री बसवराज अलगूर महाराज यांची शस्त्रपूजा, वालुग, हेडाम खेळ व भाकणुक.सायंकाळी: ५ वाजता: मान्यवरांच्याहस्ते महापूजा, महाआरती तसेच विविध पदांवर कार्यरत असलेल्या गावातील भूमिपुत्रांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार असे यात्रेचे स्वरूप आहे.श्री बाळूमामा भाविक भक्तांनी अगत्य उपस्थित राहावे अशी विनंती समस्त भक्तमंडळ, बागेवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने संयोजक श्री.दिनराज सोपान वाघमारे व श्री.श्रीकृष्ण शंकरराव पाटील यांनी केली आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here