कृतिशील युवा नेता..सर्व युवकांचा युवायोद्धा – तम्मणगौडा रवीपाटील

0

एका संवेदनशील आणि सामाजिक भान असणा-या कृतिशील आक्रमक राजकीय नेत्याचा आज वाढदिवस आहे. अगदी कमी वयात तम्मणगौडा रवीपाटील यांनी आपले सामाजिक भान दाखवतानाच उद्याच्या नेतृत्वाची चुणूक दाखविली आहे. वडील ईश्वराप्पा रवीपाटील यांच्या समृद्ध राजकारणाचा वारसा मिळाला असला तरी प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीत स्वत:च्या ध्येयासाठी लढण्याची धमक आणि अस्तित्व राखण्यासाठी कष्ट करण्याची, कार्यकर्ते फक्त जोडायचेच नाहीत, तर ते टिकवण्याची शिकवणही वडिलांकडूनच मिळाली असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच आग्रही असणा-या तम्मणगौडा यांना वाढदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!

किसी मक्सद के लिए खडे हो तो

एक पेड की तरह

गिरे भी तो बीज की तरह,

ताकि दुबारा उगकर

उसी मक्सद के लिए जंग कर सके..

काहीशा अशाच मानसिकतेत ज्यांचे समाजाप्रति कार्य सुरू जत मतदारसंघाचे युवा नेते महाराष्ट्रातील सर्वात तरुणाईत ज्याची लाडके रवीपाटील म्हणून ज्यांची ख्याती आहे. आपली धडाकेबाज कर्तव्यतत्परता, कृतिशील आक्रमकता, निर्णय होईपर्यंत समस्यांचा केला जाणारा पाठपुरावा, नागरी समस्यांचे निराकरण करताना त्यासाठी उपलब्ध करून दिलेले पर्याय, अशा सर्वच पातळीवर केलेले कार्य वेगळे आणि दखलपात्र ठरावे.

 

तम्मणगौडा यांना मी तसं पाहतोय ते सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन त्याच बरोबर एका संवेदनशील आणि सामाजिक भान असणा-या कृतिशील राजकीय नेत्याची आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अगदी कमी वयात यांनी आपले सामाजिक भान दाखवतानाच उद्याच्या नेतृत्वाची चुणूक दाखविली आहे. वडील मा. ईश्वराप्पा रवीपाटील यांच्या समृद्ध राजकारणाचा वारसा मिळाला असला तरी प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीत स्वत:च्या ध्येयासाठी लढण्याची धमक आणि अस्तित्व राखण्यासाठी कष्ट करण्याची, मित्र व कार्यकर्ते फक्त जोडायचेच नाहीत तर ते टिकवण्याची शिकवणही वडिलांकडूनच मिळाली असल्याचे दाखवून दिले आहे.

समाजमाध्यमांमध्ये तम्मनगौडा हे सर्वात अधिक सक्रिय असणारे युवानेते आहेत. त्यांच्या एका हाकेला हजारोंच्या संख्येने युवकांचा प्रतिसाद असतो , तर संपूर्ण जत तालुक्याच्या जनतेने, खासकरून युवावर्गाने आणि महिला भगिनींनी जणू शिक्कामोर्तबच केल्याचे स्पष्ट होत आहे. या यशामागे तम्मणगौडा यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत केलेल्या अपार मेहनतीचा आणि एकसंध ठेवलेल्या कार्यकर्त्यांच्या फळीचा वाटा आहे. पिता -पुत्रांनी नेहमीच कार्यकर्त्यांना बळ दिले आहे. कार्यकर्त्यांमधील गुण अचूक हेरून त्यांना संधी देण्याचे काम तम्मनगौडांनी नेहमीच केले. आज चा दिवस खूप खास आहे आज आपल्या तम्मनगौडाचा वाढदिवस ज्यांना आपण सर्वजण प्रेमाने सावकार म्हणतो असा नवीन उमदं कर्तृत्वान तरुण तडफदार नेतृत्व अतिशय मनमिळाऊ आणि रुबाबदार स्वभावाने प्रेमळ आणि सर्वांचे आवडते तम्मणगौडा आपल्या महाविद्यलयीन जीवना पासून सर्व तरुणांचे आवडते..

 

तुम नही हम्म या तत्त्वावर सर्वाना एक जुटीने सोबत घेऊन चालणारे त्यांना त्यांच्या कार्यामुळे च सर्वांनी सावकार ही पदवी आपोआप बहाल केली आपल्या स्वभावाने आणि कार्याने त्यांनी हजारो युवक आणि तरूणांच्या मनावर राज्य केला आपल्या संघर्षा च्या बळावर वडिलांच्या पायावर पाऊल ठेवत त्यांनी हजारोंचा जनसपंर्क जोडलं युवा ग्रुपची स्थापना करून सर्व युवकांना एकत्र करत आपल्या सामाजिक कार्या ची सुरुवात केली आज ते भाजपचे निवडणूक प्रमुख,
राष्ट्रीय महामार्ग महामंडळाचे संचालक बनून जत वासियांचे अनेक प्रश्न सोडवत आहेत सर्वांच्या मदतीला धावत अहोरात्र जतकरांच्या सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी त्यांनी स्वतः ला झोकून दिलयं.

 

असे दिलदार व्यक्तिमत्व त्यांनी महाविद्यलयीन जीवनात महाविद्यलयीन स्तरावर विद्यार्थ्यंचे नेतृत्व करताना त्यांनी अनेक विद्यार्त्याचे प्रश्न सोडवले तसें ते युवकांचे लाडके सावकार बनले एवढ्या वरच न थांबता ते असेच सर्वाना सोबत घेऊन चालत राहिले त्यांच शैक्षणिक, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात पण खूप योगदान दिलं आणि अजून पण त्यांच कार्य सुरुच आहे सहकार आणि सामाजिक बांधीलकी जपत आज ते आपल्या आदरणीय उपमुख्यमंत्री ना.श्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकूळे साहेब, यांच्या मागर्दर्शना खाली जत तालुका भारतीय जनता पक्षाची धुरा सांभाळत आहेत. त्यांनी समाज सेवेत स्वतः ला वाहून घेऊन सर्वमान्यां साठी तण मन लावून ते काम करत आहेत त्यांच प्रत्येक विषयांवर खूप काळजी पूर्वक मनापासून करत असतात.

 

Rate Card

निवडणुका असो अथवा सामाजिक उपक्रम तम्मनगौडा यांनी परफेक्ट मॅनेजमेंटचा पाठ दाखवून दिला आहे.टाकलेला प्रत्येक डाव अचूक परिणाम साधणारा ठरला, ते राजकारणात खणखणीत नाणे ठरले आहेत युवकांच्या पाठिंब्याने यांनी आजवर केलेल्या अनेक सामाजिक कामांची नोंद गोर गरीब जनतेचे प्रश्न सोडवत अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहेत .

 

अगदी कमी वयात तम्मनगौडा यांनी आपले सामाजिक भान दाखवतानाच उद्याच्या नेतृत्वाची चुणूक दाखविली. तम्मणगौडांचा आजवरचा वादळी प्रवास यांचा राजकीय झंझावात, अचूक निर्णय क्षमता आणि त्यांच्या एका हाकेस हजारोंच्या युवकांची फळी त्यांच्या पाठीशी जमा होणारे, जीवाला जीव देणारे कार्यकर्त्यांचे मोहोळ पाहता तम्मनगौडा रवीपाटील राज्यातील नव्या राजकीय समीकरणातील आश्वासक तरुण चेहरा ठरतील.

अशा युवा नेत्या चा आज वाढदिवस

वाढदिवस एका…… वादळाचा,वाढदिवस एका….. धगधगत्या निखाऱ्यांचा,

वाढदिवस एका….. असामान्य नेत्याचा,वाढदिवस एका….. सच्या मित्राचा,

वाढदिवस एका….. जत तालुक्यातील युवकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्यांचा,

वाढदिवस एका….. विशाल अथांग सागराचा,वाढदिवस एका….जतच्या वाघाचा,

 

२५ ऑगस्ट जत विधानसभा निवडणूक प्रमुख तथा राष्ट्रीय महामार्ग महामंडळाचे संचालक तम्मणगौडा रवीपाटील सावकार आपल्याला जन्मदीवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

तम्मणगौडा रवीपाटील यांना त्यांच्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो ही श्री चरणी सदिच्छा..

 

शब्दांकन व शुभेच्छुक; श्री बसवराज पाटील संस्थापक अध्यक्ष बसवसेना.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.