जत : सध्या माडग्याळ ते अंकलगी दरम्यान म्हैसाळ योजनेच्या बंदिस्त पाईपलाइनचे काम गतीने सुरू आहे. या कामाची पाहणी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तथा श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हभप तुकाराम बाबा महाराज यांनी केली. ज्या गतीने काम सुरू आहे त्याबद्दल तुकाराम बाबा यांनी समाधान व्यक्त करत जलसंपदा व कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले.
जत पूर्व भागात म्हैसाळचे पाणी दाखल झाले पाहिजे यासाठी तुकाराम बाबा यांनी लढा उभारला. संख ते मुंबई मंत्रालय पायी दिंडी, जिल्हाधिकारी, तहसिल कार्यालयासमोर आंदोलने, मोर्चे, पाणी परिषदा घेत बाबांनी जनजागृती केली. तालुक्यातील मायथळ पर्यत दाखल झालेले म्हैसाळचे पाणी सायफन पध्दतीने माडग्याळ, व्हसपेठ, गुडडापूर, संख मार्गे अंकलगी तलावात जावू शकते यासाठी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तथा श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते तुकाराम बाबा यांनी सर्वप्रथम लढा उभारला.
यावेळी श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संजय धुमाळ, मोहन गायकवाड, तानाजी पाटील, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संजय धुमाळ, डॉ. रविकिरण म्हेत्री महातेश स्वामी, सलीम अपराध, बसवराज बिराजदार, गगय्या स्वामी, महेश भोसले, चनप्पा आवटी, नारायण कोरे, संजय हदीमणी, संतोष पाटील, अनिल उदगेरी, महेश सूर्यवंशी, उमराणी, बिराण्णा कोहळळी, कन्याकुमार हत्ताळी, प्रशांत भगरे, सचिन कुकडे, शिवलिंगप्पा तेली, काशीराया रेबगौंड यांच्यासह बागडेबाबा मानव मित्र व पाणी संघर्ष समितीचे सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
सध्या हे काम गतीने सुरू असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. कामाबद्दल पाहणी करून तुकाराम बाबा यांनी समाधान व्यक्त केले.
■ काम पूर्ण होताच पाणी सोडा- बाबा
सध्या मायथळ ते अंकलगी दरम्यानचे बंदिस्त पाईपलाईनचे काम गतीने सुरू आहे. अर्धा पावसाळा संपत आला तरी अद्याप जत पूर्व भागात पावसाचा पत्ता नाही. भयावह दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. सदरचे काम पूर्ण झाल्यास व्हसपेठ, गुडडापूर, आसंगी जत, संख, अंकलगीसह सोन्याळ व उटगी दोडण्णाला मध्यम प्रकल्पात पाणी सोडणे शक्य होणार आहे. या भागातील तलाव भरल्यास पाणी टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. सध्या प्रशासनाने युद्ध पातळीवर काम हाती घेतले आहे त्यांचे कौतुक करावे तितके थोडे असल्याचे सांगत हभप तुकाराम बाबा महाराज यांनी काम पूर्ण करा व पाणी सोडून तलाव भरून द्या अशी आग्रही मागणी पत्रकारांशी बोलताना केली.