जत : कोथरूड पुणे शाखेचे विमा प्रतिनिधी मच्छिंद्र नामदेव काशिद यांची दुबई येथे होणाऱ्या एमडीआरटी या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी पात्र झाले आहेत. ही परिषद परिषद २७ ते ३१ ऑगस्ट दरम्यान दुबई येथे होत आहे.त्यांच्या निवडीमुळे जत तालुक्यातील शेगावसह मोकाशेवाडी गावातून सर्वत्र कौतुक होत आहे.
मच्छिंद्र काशिद यांनी ग्रामीण भागातून येऊन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून शिक्षण घेतले. पुण्यासारख्या शहरामध्ये येऊन त्यांनी हे यश मिळवले आहे.
त्यांचे मूळ गाव मोकाशेवाडी येथील आहे.कोथरूड शाखेचे शाखाधिकारी सौ. शैलजा बोरकर, उपशाखा अधिकारी शेख सर, विकास अधिकारी किरण होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे यश मिळवले आहे .
कोथरूड एलआयसी शाखा तसेच त्यांच्या सर्व ग्राहकातून कौतुक होत आहे.पुणे येथील दत्तनगर आणि धायरी या दोन कार्यालयातून एलआयसीचा व्यवसाय करतात.