कागल : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला लॉजवर आणत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी कागल पोलिसांनी लॉज मालकासह दोघांना अटक केली आहे. उन्मेश अनिल शिंदे (वय १९, रा. इंगळी, ता. हातकणंगले) असे मुख्य आरोपीचे नाव आहे. रवींद्र तानाजी कारंडे (वय २९, रा. हॉटेल साई पॅलेस लॉज, कागल) असे लॉज मालकाचे नाव आहे.
याबद्दलची तक्रार पीडितेने स्वतः पोलिसात दिली आहे. पीडित एका शाळेत शिकत आहे. आरोपीने ३ ऑगस्ट आणि २५ ऑगस्ट २०२४ रोजी पीडितेस लॉजवर आणले होते. ही बाब तिच्या घरी समजल्यावर पालकांनी कागल पोलिमान शात घेतली