कल्याण: राज्यभरात अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत किंवा उघड होत असताना, मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कल्याण पूर्व भागात असाच प्रकार घडला आहे. एका दहा वर्षीय मुलीवर धर्मेंद्र यादव (३२) याने शनिवारी लैंगिक अत्याचार केले. त्याला अटक केली आहे. शनिवारी दुपारी आरोपीने मुलीवर अत्याचार केले.
मुलीने घडलेला प्रकार पालकांना सांगितल्यावर पालकांनी मुलीसह मानपाडा पोलिस ठाणे गाठले.पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपी यादवला अटक केली. त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यादवने आणखी काही मुलींवर लैंगिक अत्याचार केले असल्याचा संशय असल्याने पोलिस त्यादृष्टीने तपास करीत आहेत.