हाऊसफुल ५’मध्ये जॅकलीनचा जलवा
हाऊसफुल चित्रपटाच्या सीरिजने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. त्यामुळेच या सीरिजमधील पाचव्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. निर्माते साजीद नाडियादवालाही ‘हाऊसफुल ५’ बनवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
पुढल्या महिन्यात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. ३०० कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, फरदीन खान आणि संजय दत्त दिसणार आहेत. या यादीत आता जॅकलीन फर्नांडीसचंही नाव सामील झाले आहे. यात जॅकलीन आणि अक्षय यांची जोडी जमली असल्याचे समजते.
यात आणखी तीन अभिनेत्री दिसणार आहेत. लवकरच या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात येईल. तरुण मनसुखानी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारा हा चित्रपट पुढल्या वर्षी जूनमध्ये रिलीज करण्याची योजना आहे.