पाटना : बिहारच्या अररिया जिल्ह्यात जमावाच्या तालिबानी निर्णयाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत जमाव एका युवकाला पकडून त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची पूड टाकताना दिसतो. वेदना असह्य होऊ तरुण आरडाओरडा करतो; परंतु कोणाच्याही हृदयाला पाझर फुटला नाही. हा सगळा प्रकार दुचाकी चोरीच्या संशयावरून करण्यात आला.व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
लोकांनी दुचाकी चोरीच्या संशयावरून या तरुणाला पकडले होते; परंतु त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्याऐवजी जमावाने कायदा हातात घेऊन त्याला शिक्षा करण्याचा निर्णय घेतला. आधी त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला हात बांधून उभे करण्यात आले. नंतर त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची पूड टाकण्यात आली. एवढे झाल्यानंतर त्याला बळजबरीने एका स्टूलवर बसण्यास भाग पाडण्यात आले.