आजही समाजातील भोंदू महाराजाच्या भूलथाफाना बळी बडणारी संख्या कायम आहे,असाच एका प्रकार इंदापूर तालुक्यातून समोर आला आहे.
पैशांचा पाऊस पडतो असे आमिष दाखवून एकाला १२ लाख ९८ हजार रुपयांची फसविल्याचा प्रकार घोलपवाडी (ता. इंदापूर) येथील गावाच्या हद्दीत घडला आहे.यासंदर्भात वालचंदनगर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली असून सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे
याप्रकरणी फसवणूक झालेले सतीश कृष्णा मांडवे (रा. श्रीपूर ता. माळशिरस) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उत्तम लक्ष्मण भागवत (रा घोलपवाडी ता, इंदापूर), काळू रोहिदास (रा जांभूड ता माळशिरस), श्रीकृष्ण खुडे (रा बोरगाव तालुका माळशिरस) व दोन अनोळखी महाराज,एक अनोळखी महिला व एक पुरुष अशा सात जणांवर महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.१० जून ते १७ ऑगस्ट २०२४ या कालावधीमध्ये घोलपवाडी गावाच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे. उत्तम भागवत यांनी सतीश मांडवे श्रीपूर यांना पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून तुझ्या सर्व अडचणी दूर करतो असे सांगितले.
यासाठी भागवत याने घोलपवाडीत त्याच्या राहत्या घरात पूजा विधी व जादूटोणा करून प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगून मांडवे यांच्याकडून रोख व ऑनलाइन १२ लाख ९८ हजार रुपये घेतले होते.मात्र मांडवे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिस ठाणे गाठत,अपबिती सांगितली.
याप्रकरणी एकाने बडतर्फ असतानाही बारामती येथे पोलिस असल्याची मांडवे यांना सांगितले. तसेच बारामती पोलिस ठाण्यात दाखल केलेली केस मिटवतो, म्हणून दीड लाख रुपये रोख स्वरूपात घेतले. दरम्यान गदादे पोलिस हा बडतर्फ असल्याची माहिती सतीश मांडवे यांना मिळाल्यानंतर त्यांना विचारणा केली असता गदादे याने धमकी देत भूतबाधा करून जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी दिली. निलंबित गदादे याच्यावरही वालचंद नगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.