जत : राजे रामराव महाविद्यालय,जत येथे मेडिकल व इंजिनिअरला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात 11 वी व 12 वी च्या विद्यार्थींसाठी खास मार्गदर्शक कोंचीग क्लासची MHT-CET/NEET/JEE वर्गाची सुरवात करण्यात आली. या मार्गदर्शक कोंचीग क्लासचे उद् घाटन वरिष्ठ विभागातील प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.महादेव करेन्नवर यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी बोलताना प्रा.महादेव करेन्नवर म्हणाले की, आज विद्यार्थींसंख्या प्रचंड वाढल्यामुळे विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रचंड स्पर्धा आहे. स्पर्धेत टिकायचे असल्यास योग्य दिशा आणि मार्गदर्शन महत्वाचे आहे. राजे रामराव महाविद्यालयाचा विद्यार्थी स्पर्धेत यशस्वी झाला पाहिजे म्हणून मेडिकल व इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक कोंचीग क्लासची सुरुवात करण्यात आली असून विद्यार्थीची तयारी करून घेण्यासाठी हे महाविद्यालय व महाविद्यातील प्राध्यापक सदैव तयार आहेत असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कनिष्ठ विभागप्रमुख कॅप्टन प्रा.पांडुरंग सावंत म्हणाले की, विज्ञान शाखेमध्ये प्रचंड स्पर्धा आहे.उच्च ध्येय गाठण्यासाठी MHT-CET/NEET/JEE या परीक्षेमध्ये यश मिळविणे अतिशय महत्त्वाचे आहे. जत सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या परीक्षांच्या माहितीसाठी व अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी मोठ्या शहराशिवाय पर्याय नव्हता. तोच पर्याय महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना महाविद्यालयात उपलब्ध करून दिला आहे. याचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहनही केले. या कोंचीग क्लासला मार्गदर्शन करण्यासाठी वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील अनुभवी प्राध्यापक वर्ग प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी उपलब्ध करून दिला आहे.
विविध विषयांची पुस्तके व ग्रंथालयात खास अभ्यासिकेची सोय करण्यात आली आहे. सुसज्ज संगणक कक्ष देखील उपलब्ध करून दिला असून प्राध्यापकांचे विद्यार्थी म्हणेल त्यावेळी मार्गदर्शन मिळणार आहे.प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.सचिन लोखंडे यांनी आभार प्रा.दिनेश वसावे यांनी मानले.कार्यक्रमास वरिष्ठ विभागातील प्रा.पासले, प्रा.राजेश सावंत, प्रा.चांदवले तर कनिष्ठ विभागातील प्रा.सुरेश बामणे, प्रा.माने, प्रा.तडवी इतर प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेडिकल व इंजिनिअरिंगच्या कोचिंग क्लासच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना प्रा.महादेव करेन्नवर