‘मराठा समाजासह अल्पसंख्याकांना आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध’- उपमुख्यमंत्री अजित पवार

0
12

अजित पवारांची जन सन्मान यात्रा मराठवाड्यात दाखल

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जन सन्मान यात्रा आज मराठवाड्यात पोहोचली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे हे यावेळी उपमुख्यमंत्र्यांसोबत होते. अहमदपूर विधानसभा मतदारसंघात आयोजित कार्यक्रमात जनसमुदायाला संबोधित करताना अजित पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याबद्दल जनतेची माफी मागितली. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याबद्दल मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो’, या शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

 

अजित पवार यांनी यावेळी बोलताना, जे दोषी असतील त्यांची चौकशी केली जाणार आहे. दोषींना सोडलं जाणार नाही. कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकलं जाईल, अशी माहिती दिली आहे. दुर्दैवी घटनेबद्दल दु:ख व्यक्त करताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, “राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून मी वचन देतो की, राज्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत”.

 

आम्ही कधी जातीपातीचं, मतभेदाचं राजकरण करत नाही आम्ही धर्मनिरपेक्षतेवर ठाम आहोत.” या शब्दांत अजित पवार यांनी आपल्या जनतेप्रती असणाऱ्या कल्याणकारी भावना व्यक्त केल्या. अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील महिला आणि शेतकऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना राष्ट्रवादीचे आमदार डॉ. बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांत अहमदपूर मतदारसंघासाठी २५०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांना मान्यता मिळाली आहे. या मतदारसंघात रस्ते विकास प्रकल्पांसाठी ३५० कोटी रुपये आणि रस्ते रुंदीकरण उपक्रमांसाठी १०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय, सार्वजनिक कामांसाठी २५५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं आणि ३० खाटांच्या रुग्णालयालाही मान्यता देण्यात आल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं आहे.

 

अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते देखील आहे. विकास निधीबद्दल बोलताना ‘मी कठोर आर्थिक शिस्त पाळतो’, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.‘महाराष्ट्राकडे योजना आणि प्रकल्प राबवण्यासाठी भरपूर संसाधनं आहेत. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांव्यतिरिक्त, उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची दिवसा वीज देण्याची मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने ९५०० मेगावॅट वीज क्षमतेच्या सौरउर्जा प्रकल्पासाठीची आपली वचनबद्ध नमूद केली आहे. आपल्या सरकारच्या प्रमुख योजनेबद्दल बोलतांना, ८७ हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले आहेत. एक लाख महिलांना याचा लाभ मिळावा हे आमचं लक्ष असल्याचं सांगितलं आहे.

 

राज्यासाठी महत्त्वाचा ठरलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी भाष्य केले. मराठा समाज आणि इतर अल्पसंख्याकांना आरक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे ते यावेळी म्हणाले आहेत.

 

महिला सुरक्षेबाबतच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करताना अजित पवार म्हणाले की, ‘महिलांवरील अत्याचार हे अक्षम्य पाप आहे’ कारण राज्यात बलात्कार आणि अत्याचाराच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. सरकार बदलू शकते, परंतु महिलांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्याची वचनबद्धता सर्वोपरि आहे.तत्पूर्वी, अजित पवार यांचे लातूर विमानतळावर समर्थक, कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यावेळी त्यांनी स्थानिकांच्या तक्रारीही ऐकून घेतल्या. तसेच, शिरूर येथील महादेव मंदिरात जाऊन पूजा केली. पूर्वीप्रमाणेच, यावेळीही महिलांनी अजित पवाराना राख्या बांधल्या. त्यानंतर अजित पवार यांनी वसमत विधानसभा मतदारसंघाला भेट देऊन महिला व शेतकऱ्यांशी संवाद साधला

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here