सांगलीतील कबड्डीपटूचा खून प्रेमसंबंधातून

0
10

सांगली : जामवाडीतील कबड्डीपटू अनिकेत तुकाराम हिप्परकर (वय २१) याच्या खूनप्रकरणी संशयित मंगेश ऊर्फ अवधूत संजय आरते (२७, रा. मरगूबाई मंदिराजवळ, जामवाडी) व जय राजू कलाल (१८, रा. पटेल चौक, सांगली) या दोघांना अटक केली आहे. तर चौघा अल्पवयीन युवकांचा सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

 

मृत अनिकेतचे संशयित मंगेशच्या नात्यातील एका तरुणीशी असलेले प्रेमसंबंध आणि पूर्वीचा वाद यातून खून केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कबड्डीपटू अनिकेत याचे संशयित मंगेश याच्या नात्यातील एका तरुणीबरोबर प्रेमसंबंध होते. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. तसेच गतवर्षी २२ ऑक्टोबर २०२३ रोजी संशयित मंगेश याच्या वाढदिवशी दोघांमध्ये वाद झाला होता. मृत आणि संशयित एकाच मंडळाचे खेळाडू होते. परंतु, त्यांच्यात अंतर्गत धुसफूस सुरूच होती.

 

आठ दिवसांपूर्वीही त्यांच्यात वाद झाला होता. यातूनच मंगेश याने त्याचा काटा काढण्याचे ठरवले. त्याच्या सांगण्यावरूनच जय कलाल आणि चौघा अल्पवयीन युवकांनी मंगळवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास मरगूबाई मंदिराजवळ अनिकेतवर हल्ला चढवला. त्याच्या पाठीवर, डोक्यात, कंबरेवर वार केले. हल्ल्यात तो मृत झाल्यानंतर सहाजण पसार झाले.

 

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here