पुणे : पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. सोपान धोंडिबा केंद्रे (वय ३३, रा. विठ्ठलवाडी, लोणीकंद, नगर रस्ता, मूळ रा. नांदेड) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी केंद्रे यांची पत्नी आणि तिचा प्रियकर यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सोपान यांच्या आईने याबाबत फिर्याद दिली.
सोपान यांनी ६ एप्रिल रोजी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. सोपान चालक होते. तीन वर्षांपूर्वी ते पत्नी आणि मुलांसह लोणीकंद परिसरात वास्तव्यास आले होते. २०१६ मध्ये त्यांचा विवाह झाला होता. त्यांची पत्नी आणि आरोपी मधुकर यांचे अनैतिक संबंध होते. पत्नीच्या अनैतिक संबंधाची कुणकुण त्यांना लागली होती. त्यांनी याबाबतची माहिती आईला दिली होती. त्यानंतर सोपान यांनी पत्नीला अनैतिक संबंध तोडण्यास सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद व्हायचे. पत्नी आणि प्रियकर यांनी त्यांना धमकी दिली होती. प्रियकराने सोपान यांना पत्नीला सोडून दे, मी सांभाळतो, अशी धमकी दिली होती. त्यातूनच सोपान यांनी गळफास घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.