लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरी सोने घेऊन पसार; तिघांवर गुन्हे

0
15

राधानगरी : लग्न लावून देतो म्हणून ४ लाख १६ हजार रुपयांची फसणूक करून पसार झाल्याप्रकरणी राधा देशमुख ऊर्फ सोनाली कोल्हाळ (रा. मोहोळ, जि. सोलापूर), सुवर्णा अमोल बागल, अमोल शहाजी बागल (दोघे रा. नाईकवडी वस्ती, मोहोळ, ता. मोहळ, जि. सोलापूर) या तिघांना राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

 

बारडवाडी (ता. राधानगरी) येथील पांडुरंग गजानन बारड यांनी त्यांचा भाऊ रमेश याचे लग्न राधा हिच्याशी जुळवून देण्यासाठी सुवर्णा बागल व अमोल बागल यांना रोख १ लाख ६० हजार रुपये दिले होते. त्यानंतर राधा व रमेश बारड यांचा २६ एप्रिल २०२४ मध्ये विवाह झाला. विवाहप्रसंगी स्ञीधन म्हणून मुद्देमाल घेऊन पसार झाली.

 

राधा ऊर्फ सोनाली हिला लग्नात सोने, चांदी असे २ लाख ५६ हजार किमतीचे दागिने घातले. पण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी राधा देशमुख (नवरी) हि दागिन्यांसहित पांडुरंग बागल यांच्या बहिणीचेही दागिने व लग्नापूर्वी दिलेली रक्कम असे एकूण ४ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाली आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here