जत : ५ सप्टेंबर रोजी सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे स्व.पतंगराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा ऐतिहासिक सोहळा होणार आहे. यानिमित्त आज जत शहरात काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली.या बैठकीत स्व.पतंगराव कदम यांचे चिरंजीव माजी मंत्री डॉ.विश्वजित कदम,खा.विशाल पाटील,आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जत शहरातील कार्यकर्त्यांना संबोधित केले.
स्व.पतंगराव कदम यांचे आणि जत शहराचे एक गहिरे कौटुंबिक नातं होते. शेती, शिक्षण,आणि सहकार क्षेत्रात कदम साहेबांनी केलेले उल्लेखनीय कार्य सर्वांना ज्ञात आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला देशाचे विरोधी पक्ष नेते, सन्माननीय राहुल गांधीजी सांगलीच्या मातीत येणार आहेत.
या कार्यक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन या महान कार्याला आदर द्यावा व या गौरवशाली सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन डॉ. विश्वजित कदम यांनी केले.
याप्रसंगी माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, खा.विशाल पाटील, जितेश कदम,अप्पाराया बिरादार,पिराप्पा माळी, सुजय नाना शिंदे,संजीव सावंत,रामचंद्र सरगर,भूपेंद्र कांबळे,बाबासाहेब कोडग,बसवराज बिरादार,जे.के.माळी व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने व उत्साहाने उपस्थित होते.
कडेगाव येथील कॉंग्रेस मेळाव्याच्या पार्श्वभूमिवर जत येथे बैठक संपन्न झाली.