शेतकऱ्याच्या जमिनी परत द्या,अन्यथा पवनचक्क्या बंद पाडू | – महेश खराडे : ८ संप्टेबरला घाटनांद्रेत मेळाव्याचे आयोजन

0
17

सांगली : पवनचक्की ग्रस्त शेतकऱ्याच्या जमिनी शेतकऱ्यांना परत द्या अन्यथा पवनचक्क्या बंद पाडू, या प्रश्नाच्या सोडवणूकसाठी येत्या आठ सप्टेंबर रोजी घाटनांद्रे येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करणार असल्याची घोषणा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी आंदोलनाच्या ठिकाणी केली.
पवनचक्की ग्रस्त शेतकऱ्याचे पवन चक्की ग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्याल्यासमोर निदर्शने मंगळवारी करण्यात आली.
सदर आंदोलन महेश खराडे,कॉम्रेड सोशल ऑर्गनाशेनचे जयवंत आवळे,बापू भिसे, संभाजी ब्रिगेडचे ऋतुराज पवार, स्वाभिमानीचे शिवाजी पाटील, शिवसेनेचे बाळासाहेब शिंदे, अजित कर्चे,गब्बर कर्चे वैभव केंगार आदीच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

 

 

शेतकऱ्याच्या जमिनी परत द्या,पवनचक्की कंपन्याचे करायचे काय खाली मुंडी वर पाय, दलालाचे करायचे काय खाली मुंडी वर पाय अशा घोषणानी परिसर दणाणून सोडण्यात आला.त्यानंतर निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले, या निवेदनात म्हटले आहे.कोणत्याही औद्योगिक वापरासाठी शेतकऱ्याच्या जमिनी घेतल्या असतील, आणि 15 वर्षा पर्यंत त्या जमिनीचा औधोगिक वापर झाला नाही तर त्या जमिनी परत शेतकऱ्यांना आहे त्या किमतीत द्यावेत, असा शासकीय अद्यादेश आहे,मात्र कवठेमहांकाळ,जत,खानापूर,तासगाव या तालुक्यात मोठ्या प्रमाणात सृजन, सुझलोन आदी कंपन्यानी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या जमिनी 20 वर्षांपूर्वी कवडीमोल किमतीने विकत घेतल्या त्यावर त्यांनी पवन चक्क्या उभारल्या. मात्र मोठ्या प्रमाणात जमिन शिल्लक आहे.त्याचा औद्योगिक वापर झालेला नाही त्यामुळे त्या जमिनी ज्यादा दराने खाजगी लोकांनाच विकल्या जात आहेत,हे बेकायदेशीर आहे.

 

त्यामुळे ही खरेदी विक्री थांबवावी, शेतकऱ्यांना खरेदी केलेल्या दराने जमीन विक्री करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडू आंदोलकासमोर खराडे म्हणाले.त्या भागात दलालाची टोळी कार्यरत आहे.त्या माध्यमातून खरेदी विक्रीचे व्यवहार सुरु आहेत त्यात सब रजिस्ट्रर कार्यालय ही सहभागी आहे कर्जाचा बोजा असणाऱ्या जमिनीवर ही ना हरकत दाखले न घेताच विक्री होत आहे.मयत व्यक्ती जिवंत असल्याचे दाखवून ही व्यवहार झाले आहेत,याची चौकशी व्हावी.यासह निबंधका वर कारवाई करावी या मागण्या मान्य न झाल्यास पवन चक्क्या बंद पाडू या प्रश्री जनजागृती करण्यासाठी येत्या रविवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता घाटनांद्रे येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

जयवंत आवळे म्हणाले,शेतकऱ्यांनी संघटित व्हावे.ऋतुराज पवार म्हणाले भांडवलदराच्या घशात जमिनी जाऊ देणार नाही.यावेळी शेळकेवाडीचे सरपंच दत्तात्रय साळुंखे, अरुण केंगार, राहुल केंगार अजित कर्चे भगवान कर्चे बाळकृष्ण मोरे सुनील बजबाळकर विशाल बजबळकर आदिसह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here