शासनाच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत बँकांच्या खात्यामार्फत पंधराशे रुपये प्रति माह महिलांना दिले जात असून सध्या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये अनेक महिलांच्या खात्यात जमा झाले. ते काढण्यासाठी मुरुड तालुक्यातील सर्व बँकामधून महिलांची रोज मोठी गर्दी दिसून येत असून या कामाची पूर्तता करण्यासाठी बैंक कर्मचारी मंचारी बंधूंना त्यांना तोंड देताना नाकी नऊ येत आहेत. अन्य कामांसह बँकेत या कामाचा प्रचंड ताण वाढल्याने कर्मचाऱ्यांची पुरती दमछाक होताना दिसून येत आहे. या कर्मचाऱ्यांना कामावरून घरी परतण्यासाठी रोज रात्रीचे नऊ-दहा. वाजत असल्याची माहितीमिळाली. खंडित होणारा वीजपुरवठा, नेटवर्क बंद पडणे यामुळे देखील यात भर पडत असून ग्रामीण भागात यांची अधिक झळ बसत आहे. अनेक महिलांची बँक खाती काहीना काही कारणाने बंद असल्याने सुरू करण्यासाठी कागदपत्रे सादर करावी लागत असल्याने त्रास अधिक होत आहे.
आपल्या शेजारी राहणाऱ्या महिलेला पैसे मिळाले,मला का नाही ? या आणि अशा व अन्य प्रश्नांवर प्रकरणे हमरीतुमरीवर येत असून महिलांना समजविताना कर्मचारी देखील हैराण झाले आहेत. या योजनेचे पैसे घेण्यासाठी महिला भगिनी सकाळपासूनच बँकेपाशी हजर होत आहेत. या योजनेची अंमलबजावणी करताना कामाचा ताण प्रचंड वाढल्याने इतर मान्यवर ग्राहकांच्या डिपॉझिट, कर्ज, कर्ज, नेफ्ट, आर्टिजस आणि आवश्यक महत्वाच्या बँकिंग सेवेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या शासकीय योजनेची अंमलबजावणी करताना ग्राहक आणि बँक कर्मचारी यांची होणारी दमछाक यामुळे भविष्यात कोणती परिस्थिती येईल हे आज तरी सांगता येणार नाही असे काही बँकांतील कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले.