सध्याच्या काळात जर एखादा गुन्हा घडला तर सर्वांत आधी आरोपी किंवा पीडिताचा मोबाईल तपासला जातो. गुन्ह्यातील आरोपीचे मेसेज, कॉल डिटेल्स तपासून त्यातून तपासाचे काही धागेदोरे मिळतायेत का? हे पाहिले जाते. परंतु जर गुन्हेगार मेसेज आणि कॉल डिटेल्स डिलीट केले तर, अशा प्रकरणी देशातील सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मोबाईल फोनमधून मेसेज आणि कॉल डिलीट करणे हे पुराव्यासोबत छेडछाड केल्याचे मांडले गेले; तेव्हा सुप्रीम कोर्टाने फोनमधील मेसेज डिलीट करणे गुन्हा नाही असे म्हटले आहे.
दिल्ली एक्साइज पॉलिसी प्रकरणी बीआरएस नेत्या के कविता यांना जामीन मिळाला आहे. तपास यंत्रणांकडून कविता यांनी पुराव्यासोबत छेडछाड करून त्यांचा फोन फॉर्मेट केला, मोबाईलमधील मेसेजही डिलीट केलेत असा तर्क दिला. त्यावर कोर्टाने हा गुन्हा नाही. फोन खासगी वस्तू आहे लोक नेहमी मेसेज डिलीट करत राहतात असे म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितले की, सध्या लोक वेगाने त्यांचा जुना फोन बदलून नवे फोन घेत असतात. मोबाईल वेळोवेळी अपग्रेड केला जातो. ज्यामुळे जुने मेसेज डिलीट होऊ शकतात. मोबाईल फोन हा वैयक्तिक आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत गोपनीयतेमुळे फोनमधील मेसेज आणि इतर गोष्टी डिलीट केल्या जातात.