मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

0जत,संकेत टाइम्स  : शेतकरी मान्सूनच्या पावसाची आतुरतेने वाट पाहत असून केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याचे वृत्तासोबतच जत तालुक्यात शनिवारी मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली.डफळापूरपासून उमदीपर्यंत आणि लोहगाव पासून गुगवाडपर्यंत सर्वत्र पाऊस कोसळला.तालुक्याच्या काही गावात गत तीन दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. 
Rate Card
कोरोना संकटाशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना निसर्गाने यंदा चांगले संकेत दिले आहे. केरळच्या किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन झाल्याचे वृत्त धडकले. जिल्ह्यातही वातावरणात बदल होऊन दुपारपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली. जत तालुक्यात गुरूवार पासून रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. शनिवार अर्धा तास जोरदार पाऊस बरसला. तालुक्यातील काही भागात पावसाची नोंद झाली. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.