कोल्हापूर : शिये (ता. करवीर)येथील शेतात नेऊन बालिकेवर लैंगिक अत्याचार आणि खून करणाऱ्याा संशयितांनी दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन मृतदेहाची पाहणी केली. ठार मारल्यानंतरही नराधमांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
अटकेतील दोन्ही संशयितांची ‘क्राईम हिस्ट्री’ जाणून घेण्यासाठी पोलिसांचे पथक लवकरच बिहारला जाणार आहे. दरम्यान, दुसरा संशयित राहुल कुमार सिंग (वय १९, रा. बिहार) याची पोलिस कोठडीत रवानगी झाली.
पीडित बालिकेचा नातेवाइक दिनेश साहा आणि त्याचा साथीदार राहुल कुमार सिंग हे दोघे गेल्या काही दिवसांपासून पीडित मुलीला मोबाइलवर अश्लील चित्रफिती दाखवत होते. ती या दोघांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करीत असल्याने
दोघांनी तिला (दि. २१) दुपारी नारळ काढण्याच्या बहाण्याने संशयित आरोपी पीडित मुलीला घरातून घेऊन गेले.मारहाण केली. बुधवारी शेतात निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर गळा आवळून आणि लाथा- बुक्क्या मारून तिला ठार मारले. किळसवाणा आणि चीड आणणारा प्रकार म्हणजे बालिका ठार झाल्यानंतरही तिच्यावर अत्याचार केले.
घटनेनंतर घरी परतलेले दोघे संशयित रात्रपाळीच्या कामावर गेले. त्यानंतर सकाळी परत आल्यानंतर दोघांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची पाहणी केली, अशी माहिती पोलिसांनी केलेल्या चौकशीत समोर आली आहे.