बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या ‘किंग’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे शूटिंग बुडापेस्ट, हंगेरियात होणार आहे. दरम्यान, अशातच ‘हुरून इंडिया रिच लिस्ट २०२४’ रिलीज झाली. यानुसार, शाहरुख खान भारतातील सर्वांत श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर जाऊन पोहोचला आहे.
त्याची नेटवर्थ ७३०० कोटी एवढी झाली आहे. मागील वर्षी ‘फोर्ब्स २०२३’ची यादी जाहीर झाली होती. ज्यात त्याची नेटवर्थ ६३०० कोटी एवढी होती. यानुसार, शाहरुखच्या नेटवर्थने एका वर्षात तब्बल एक हजार कोटींनी झेप घेतली आहे. या यादीत शाहरुख खानशिवाय अमिताभ बच्चन, जुही चावला, करण जोहर आणि हृतिक रोशन यांची नावे समाविष्ट आहेत.