राजकोट राडा प्रकरणी १५० जणावर गुन्हे

0
2

मालवण : राजकोट येथे बुधवारी झालेल्या राड्याप्रकरणी पोलिसांनी राणे समर्थक आणि ठाकरे गटाच्या ४२ जणांसह अनोळखी दीडशे जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी कोल्हापूर येथील फॉरेन्सिक विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देत तपास केला. यावेळी राजकोट किल्ल्यावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

 

राजकोट किल्ला येथे कोसळलेल्या पुतळ्याच्या पाहणीदरम्यान बुधवारी दुपारी राणे समर्थक व ठाकरे गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यात संभाजी पाटील, मेहेक परब हे पोलिस कर्मचारीऱ्यांसह अनेक कार्यकर्तेही जखमी झाले. या राड्याप्रकरणी गर्दी, मारामारी, घोषणाबाजी, शासकीय कामात अडथळा, लोकसेवकांना त्यांच्या कामात धाक दाखवून परावृत्त करणे, दुखापत करणे, जिल्ह्यात सुरू असलेल्या मनाई आदेशाचा भंग करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, अशा विविध कलमांनुसार दोन्ही गटांतील दंगा करणाऱ्या ४२ जणांसह अनोळखी १५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.

 

फॉरेन्सिक विभागाच्या पथकाकडून पाहणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण केल्यानंतर अवघ्या आठ महिन्यांत छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. गुरुवारी कोल्हापूर येथील फॉरेन्सिक विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देत तपास केला.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here