दहा जणांसोबत लग्न अन् प्रत्येकावर गुन्हेही दाखल

0
30

नवी दिल्ली: एका महिलेने दहा वेगवेगळ्या व्यक्तींसोबत लग्न केले आणि प्रत्येक पती आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर गुन्हे नोंदवल्याचे पाहून धक्का बसलेल्या कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांनी तिला न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले.

 

३१ ऑगस्ट २०२२ रोजी विवेकने मंदिरात लग्न केले. १२ सप्टेंबर २०२२ रोजी लग्नाची नोंदणी झाली. १५ सप्टेंबर २०२२ रोजी विवेकने पत्नीला सोडले. तीन दिवस सोबत राहिलेल्या पत्नीने केवळ विवेकच नाही तर त्याच्या कुटुंबीयांवरही ४९८ अ आयपीसीचा गुन्हा दाखल केला.

 

विवेकने हा गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली. याचिकेच्या सुनावणीत हायकोर्टाला सांगण्यात आले, की तक्रारदार महिलेने आतापर्यंत नऊ गुन्हे नोंदवले आहेत. सुरुवातीला तिने मंजुनाथ नावाच्या एका व्यक्तीशी लग्न केले होते. नंतर त्याच्यासह इतरांविरुद्ध लैंगिक छळ, धमकी आणि ४९८ अ आयपीसी अन्वये नऊ तक्रारी दाखल केल्या आहेत.

 

गुन्हे काय दाखल केले?

विवेक हा तक्रारदाराचा दहावा नवरा आहे, या फिर्यादीने यापूर्वीच्या नऊ पतीविरुद्धही तक्रारी केल्या आहेत.

● यामध्ये लग्नाचे वचन देऊन पूर्ण न केल्याबद्दल बलात्कार आणि फसवणुकीचे, ४९८ अ आयपीसीचे तीन आणि खंडणीच्या इतर गुन्ह्यांचा समावेश आहे.

न्यायालय म्हणाले…

■ हायकोटनि निरीक्षण नोंदवले की, ‘महिलेच्या हातून गुन्ह्याची गाथा आता एक दशकाची झाली आहे. प्रथमदर्शनी ही प्रकरणे खोटी दिसतात. हा कायदेशीर प्रक्रियेचा दुरूपयोग आहे.

अशा तक्रारदारांनी फौजदारी न्यायव्यवस्थेला कोंडीत पकडले आहे. कोर्टाने महिलेला पुढील सुनावणीला हजर राहून आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here