कोल्हापूर : भारतातील मान्सूनचा परतीचा प्रवास सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत लांबण्याची चिन्हे आहेत. ‘ला निना’मुळे तयार होणाऱ्या कमी दाबामुळे सप्टेंबर शेवटच्या आठवड्यापर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.
भारतात जून महिन्यात मान्सूनचे आगमन होते व सप्टेंबरमध्ये त्याचा परतीचा प्रवास सुरू होतो. ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत संपूर्ण भारतातून मान्सून परततो. ३.५ ट्रिलियन रुपयांच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या मान्सूनमुळे भारताचे ७० टक्के जलसाठे भरले जातात. सिंचनाशिवाय, देशातील जवळपास निम्मी शेतजमीन जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या पावसावर अवलंबून असते.
‘ला निना’मुळे भारतात सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. यापूर्वीही ‘ला निना’मुळे मान्सून परतण्यास उशीर झाला होत, असेही ते म्हणाले.