जिल्हा परिषद, महापालिकेचा बिगुल कधी वाजणार.?स्थानिक स्वराज्य संस्था नव्या वर्षातच

0
6

लोकसभेची निवडणूक झाली आणि खासदार दिल्लीला गेले. विधानसभेची निवडणूक दिवाळीनंतर होणार आणि आमदार मुंबईला जाणार, परंतु आपल्याच गावातल्या, जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींवर काम करण्याची इच्छा असणाऱ्या इच्छुकांना मात्र आपल्या नेत्यांच्या फक्त पालख्या वाहण्याची वेळ आली आहे. एकूणच परिस्थिती पाहता नव्या वर्षातच या निवडणुकींचा धुरळा उडण्याची शक्यता आहे.

 

 

विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर अपेक्षित याआधीच्या नियोजनानुसार २० सप्टेंबरपर्यंत विधानसभेची निवडणूक लागून नोव्हेंबरमध्ये निवडणूक होईल, असा अंदाज होता. परंतु, महाराष्ट्रातील ही निवडणूक आता डिसेंबर २०२४ मध्ये होणार आहे. तसे स्पष्ट संकेत केंद्रीय निवडणूक आयोगानेही दिले आहेत. त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांमध्ये मात्र एक प्रकारचा निरुत्साह पाहायला मिळत आहे. इंडिया आघाडीतील कार्यकर्ते लोकसभेमुळे जरा उत्साहात आहेत, परंतु महायुतीच्या कार्यकर्त्यांना पदेही नाहीत आणि अन्य लाभ निवडक लोकांनाच, त्यामुळे त्यांच्यातही मोठी नाराजी आहे.

राजकारणी वाट पाहून थकले 
कोल्हापूर शहरात, तर दिवाळीच्या कोल्हापूर महापालिकेचे इच्छुक नगरसेवक, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी इच्छुक विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी या निवडणुकांची वाट पाहून थकले. फराळापासून किल्ल्यांच्या स्पर्धेपर्यंत, रेकॉर्ड डान्सपासून फुटबॉल स्पर्धेपर्यंत अनेकांनी पैसे लावले, परंतु महापालिका निवडणुका काही जाहीर होईनात. हीच इच्छुकांची झाली आहे. वैतागून या साऱ्यांनी आता हात आखडता घेतला आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here