सांगली : केंद्र शासनाने भरडधान्य खरेदीअंतर्गत ज्वारीची खरेदी केली आहे. सप्टेंबर महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानांतून ज्वारीचे वितरण केले जाणार आहे. त्यामुळे पात्र शिधापत्रिकाधारकांना आता पोळीसोबत भाकरीची चव घेण्याची संधी मिळणार आहे. जिल्ह्यात एकूण रेशनकार्डधारकांची संख्या सात लाख ३९ हजार ३१३ आहे.
पुढील किमान दोन-तीन महिने तरी स्वस्त धान्य दुकानातून गव्हाऐवजी ज्वारीचेच वितरण पात्र शिधापत्रिकांवर केले जाणार आहे, असे चित्र राज्यभरात दिसून येत आहे. त्यादृष्टीने जिल्हा पुरवठा विभागाकडूनही तसे नियोजन केले जात आहे.
केंद्र शासनाने रेशनकार्डधारकांसाठी ज्वारीचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध केला आहे. त्याचा फायदा आता लाभार्थ्यांना मिळणार आहे. दैनंदिन आहारात नागरिकांच्या आरोग्यासाठी पौष्टिकता लाभावी, यादृष्टीने रेशनकार्ड धारकांसाठी ज्वारीचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
शासनाच्या निर्णयानुसार ज्वारीचा दीड लाख क्विंटल साठा पहिल्या झाला आहे. त्याचे तालुकानिहाय वाटप सुरू आहे.टप्यात उपलब्ध
– आशिष बारकुल, जिल्हा पुरवठा अधिकारी, सांगली.