छत्रपती शासन ग्रुपच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी महेश कोडग

0
25



आवंढी,संकेत टाइम्स : युवाशक्ती सामाजिक संघटना, ठाणे प्रणित छत्रपती शासन ग्रुप भारत देशच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी जत तालुक्यातील आवंढी सामाजिक कार्यकर्ते महेश कोडग यांची निवड करण्यात आली. ग्रुपचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष विजय गरड व प्राणजित गवंडी यांनी कोडग यांना त्यांच्या निवडीचे पत्र दिले.

यावेळी बोलताना नुतन जिल्हाध्यक्ष महेश कोडग म्हणाले कि,छत्रपती शिवाजी महारांचा इतिहास सर्वत्र प्रसारित करुन महाराजांचे आचार विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहचविण्याचे कार्य या ग्रुपच्या माध्यमातून संबंध देशभर सुरु आहे.





माझ्या या ग्रुपमधील निवडीमुळे मला देखील हे कार्य करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. येणार्या काळात छत्रपती शासन ग्रुपची व्याप्ती संपुर्ण सांगली जिल्ह्यात वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवुन कार्य करु. निवडीवेळी ग्रुपचे राज्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here