मलायका अरोरा तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसते. सध्या मलायकाचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत ५० वर्षांची मलायका थक्क करणारं आणि सगळ्यात कठीण वर्कआउट करताना दिसत आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे.
मलायकाचा हा व्हिडीओ पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत चाहत्यांनी मलायकाचं कौतुक केलं आहे.