उटगी : भाजप नेते तम्मणगौडा रवीपाटील यांच्या जनकल्याण संवाद पदयात्रेचा आज तारीख 31 रोजी सायंकाळी सहा वाजता उटगी येथील गणपती मंदिर समोर भव्य सांगता समारंभ संपन्न होणार आहे.गेल्या महिन्यापासून रवी पाटील यांची संवाद पदयात्रा सुरू आहे.
पदयात्रेचा हा तिसरा टप्पा असून उमदी येथून सुरू झालेली पदयात्रा बिळूर,डफळापूर,कुंभारी,शेगाव,बनाळी,जाडरबोबलाद मार्गे आलेली पदयात्रा उटगी येथे सांगता होणार आहे.
यावेळी मतदारसंघातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आव्हान संयोजकांनी केले आहे.दरम्यान पदयात्रेला नागरिकांसह महिलांचा मोठा प्रतिसाद मिळला आहे.
जाडरबोबलादमध्ये तूफान गर्दी
मुळ जाडरबोबलादचे असलेले तम्मणगौडा रवीपाटील यांच्या जन्मगावात शनिवारी पदयात्रा आली.या पदयातेचे स्वागत करण्यासाठी नागरिक, महिलांनी तूफान गर्दी केली होती.शनिवारी जाडरबोबलादला यात्रेचे स्वरूप आले होते.येथे तूफान सभाही घेण्यात आली.