भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याकडून शेट्टींचा प्रचार | विलासराव जगताप यांचा थेट आरोप

0
7

जत :लोकसभा निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघात भाजपचे काम न करता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांचे काम केल्याचा आरोप माजी आमदार विलासराव जगताप यांनी केला आहे.

 

 

जत येथे प्रकाशराव जमदाडे जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी जगताप यांनी भाजपची ध्येय, धोरणे व चलाखीवर जोरदार प्रहार केला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, माजी संचालक सरदार पाटील आदी उपस्थित होते. विलासराव जगताप म्हणाले, लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला अवघ्या नऊ जागा जिंकता आल्या.

 

 

चुकीचे धोरण व मनमानी कारभार अंगलट आला. सांगली लोकसभा निवडणुकीत संजयकाका पाटील यांना उमेदवारी देवू नका, पराभव निश्चित असल्याचे आपण व दुष्काळी फोरमच्या नेत्यांनी भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले होते त्यावेळी त्यांनी तुम्हाला विश्वासात घेवून निर्णय घेवू, असे सांगितले पण प्रत्यक्षात पहिल्याच यादीत संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिली. संजयकाका पाटील यांना दिलेली उमेदवारी मान्य नसल्याने मी उघडपणे अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला पण भाजपचे जिल्हाध्यक्ष पदावर असलेले निशिकांत पाटील यांनी जिल्हाध्यक्षपद त्यांच्याकडे असतानाही भाजपच्या उमेदवाराचे काम न करता राजू शेट्टी यांचे काम केले आहे.

 

 

मी स्पष्टपणे सांगून भाजप विरोधात काम केले पण निशिकांत पाटील यांनी ज्या पद्धतीने काम केले ते चुकीचे आहे. पक्षाने त्यांच्यावर कोणती कारवाई केली? असा सवालही जगताप यांनी यावेळी उपस्थित केला. जतमध्ये भाजप इच्छुकांची संख्या वाढवून त्यांना बळ देत आहेत पण अद्याप कोणाचीच उमेदवारी निश्चित नाही. सर्व इच्छुकांना तुम्हालाच उमेदवारी म्हणून सांगत आहेत, भाजपची ही भूलभुलैय्या पद्धत बरोबर नसल्याचे जगताप यांनी सांगितले

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here