ऐतिहासिक उमराणी आदर्श गाव व्हावे | – अमोल डफळे | घनकचरा संकलन करणाऱ्या गाड्यांचे लोकार्पण

0
46
जत : जत तालुक्यातील उमराणी ग्रामपंचायतीच्या वतीने घनकचरा व्यवस्थापनासाठी कचरा संकलन दोन गाड्या घेण्यात आल्या आहेत.त्या कचरा संकलन गाड्याचे लोकार्पण जतचे सहाय्यक निबंध अमोल डफळे यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी सरपंच विजयकुमार नामद,उपसरपंच संजय शिंदे,ज्येष्ठ नेते आप्पासाहेब नामद व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना अमोल डफळे म्हणाले,उमराणी ऐतिहासिक गाव आहे,इतिहासात या गावाचे मोठे महत्व आहे.त्यामुळे गाव कायम आदर्श राहिले पाहिजे.
गावातील स्वच्छता महत्त्वाचा भाग असून ग्रामपंचायतीच्या घनकचरा गाडीमुळे गावातील कचरा एकत्रित करून  गावाबाहेर कचरा डेपो करून व्यवस्थापन करण्यात येणार आहे.

त्यामुळे गाव स्वच्छ व सुंदर राहण्यास मदत होईल.ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमास सहकार्य करावे.गावातील स्वच्छता हा प्राधान्याचा प्रश्न आहे.त्याचबरोबर रस्ते व सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील आहे,आमचे सहकार्य कायम राहिल.यापुढे तालुक्यातील स्वच्छ सुंदर व आदर्श गाव व्हावे अशी अपेक्षा डफळे यांनी व्यक्त केली.
उमराणी ता.जत येथील कचरा संकलन करणाऱ्या गाड्याचे लोकार्पण करण्यात आले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here