…तर खात्यातून रक्कम गायब होणार !
सर्वसामान्य नागरिकांना गंडवण्यासाठी सायबर चोरटे रोज नवनवी शक्कल लढवत आहेत.आता चोरट्यांनी ट्रोजन या व्हायरसचा वापर सुरू केल्याचे काही घटनांमधून समोर आले आहे. लिंक, पीडीएफ किंवा अँप फाइलच्या माध्यमातून हा व्हायरस पाठवून मोबाइल हॅक केला जातो. त्यानंतर बैंक खात्यातील रक्कम परस्पर अन्य खात्यात पाठवली जाते. त्यामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सायबर चोरटे खातेधारकांना आधार कार्ड, पैन कार्ड अपडेट करण्यास सांगतात. त्यासाठी नागरिकांच्या मोबाइलवर लिंक, पीडीएफ किंवा अँप फाइल पाठवली जाते. खातेधारकांनी त्यावर क्लिक केल्यास मोबाइलमध्ये ट्रोजन व्हायरस शिरतो. त्याच्या मदतीने चोरटे मोबाइल ।कि करतात. मोबाइलमधील बँकेचे अँप, ऑनलाइन ट्रान्झेक्शन अँपचा वापर करून बैंक खात्यातील रक्कम इतर खात्यावर परस्पर पाठवली जाते. बैंक खात्यातून रक्कम इतर बैंक खात्यावर पाठवाल्यानंतर खातेधारकाला त्याबाबत बँकेकडून एसएमएस पाठवला जातो.तो चाचल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे खतेधारकांच्या लक्षात येते.खातेधारक पोलीस ठाण्यात किंवा सायबर सेलकडे धाव घेऊन तक्रार नोंदवतात. मात्र, यादरम्यानच्या काही मिनिटांत सायबर चोरटे हस्तांतरित करून घेतलेल्या बैंक खात्यावरून अन्य बैंक खात्यांवर छोट्या रकमा पाठवतात. पोलिसांना त्यामुळे सायबर पत्रव्यवहार करून रक्कम होल्ड करण्यात अडचणी येतात.
मोबाइलमध्ये व्हायरस
छत्रपती संभाजीनगरातील सिडको एन-१ येथील एका महिलेच्या मोवाइलवर सायबर चोरट्याने पीडीएफ फाइल पाठवली, महिलेने फाइल ओपन केली असता त्यांच्या बैंक खात्यातून २६ हजार रुपये आणि यूपीआयद्वारे ९ हजार ५०० रुपये अनोळखी बँक खात्यावर परस्पर हस्तांतरित करून घेतले. पैसे खात्यातून गेल्याचे समजताच महिलेने पोलिसांत धाव घेतली. सायकर विभागाने तपास केला असता चोरटधाने पीडीएफ फाइलद्वारे व्हायरस पाठवल्याचे समोर आले.
अशी घ्या काळजी…
एखादी फाइल किंवा अँप डाऊनलोड केल्यास आपण व्हायरस टोटल डॉट कॉम येबसाइटवर पडताळणी करावी. फसवणूक झाल्यास तत्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार कराबी, १९३० क्रमांकावर संपर्क साधून तत्काळ माहिती देऊन तक्रार नोंदवावी. नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. अनोळखी क्रमांकावरून आलेल्या लिंक किंवा पीडीएफ फाइलवर क्लिक करू नये. अनोळखी व्यक्तीला फोनवर कोणतीही गोपनीय माहिती देऊ नका. त्याच्या सांगण्यावरून कोणतीही कृती करू नये. एखादी फाइल, अँप इन्स्टॉल केल्यानंतर से मोवाइलच्या बँकग्राउंडला काम करते. त्यामुळे मोबाइल हॅक करणे शक्य होते।