शिक्षकांचा वाहतूक भत्ता द्या,या शिक्षकनेत्यांनी केली मागणी

0जत,संकेत टाइम्स : प्राथमिक शिक्षकांच्या मे महिन्याच्या पगारातून कपात केलेला वाहतूक भत्ता जून महिन्याच्या पगारात समाविष्ट करावा,अशी मागणी शिक्षक भारतीचे तालुका अध्यक्ष दिगंबर सावंत यांनी शिक्षण सभापती आशाताई पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

प्राथमिक शिक्षकांना दीर्घ सुट्टीत वाहतूक भत्ता दिला जात नाही.


पण इतर शैक्षणिक व प्रशासकीय कर्तव्य पार पाडत असतील तर त्यांना वाहतूक भत्ता देय आहे,असा शासन निर्णय आहे.त्या अनुषंगाने उन्हाळी सुट्टी जाहीर होऊन देखील जवळपास जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना कोरोना संदर्भातील लसीकरण,कोविड सेंटर,कॉल सेंटर , ग्रामीण रुग्णालयात, अन्य कामे करावी लागत आहेत.

माहे मे व जून 2021 च्या दीर्घ सुट्टीच्या कालावधीत प्राथमिक शिक्षकांना कोविड 19 च्या प्रतिबंधक उपाय योजना करण्यासाठी सेवा अधिग्रहण करण्यात आलेल्या आहेत.

Rate Card


त्यामुळे शिक्षकांना माहे मे महिन्यात कपात केलेला वाहतूक भत्ता जून महिन्याच्या पगारात देण्यात यावा.यावेळी मलय्या नांदगाव,नवनाथ संकपाळ,अविनाश सुतार,बाळासाहेब सोलनकर,जितेंद्र बोराडे, विनोद कांबळे, गणपती खांडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.