नवी दिल्ली: लहान-मोठे पेमेंट नागरिक हल्ली जी-पेच्या साहाय्याने करीत असतात. त्यामुळे खिशात रोकड ठेवावी लागत नाही. परंतु यामुळे पेमेंटची लांबलचक हिस्ट्री तयार होत असते. ही डिलिट कशी करावी, याची माहिती अनेक युजर्सना नसते.
जी-पेची पेमेंट हिस्ट्री डिलीट करण्यासाठी सर्वप्रथम अँपच्या ‘प्रोफाइल सेक्शन’ मध्ये जावे. त्यातील ‘सेटिंग्ज’वर क्लिक करून ‘प्रायव्हसी अँड सिक्युरिटी’ या विभागात जावे. त्यात ‘डेटा अँड पर्सनलायझेशन’मध्ये गेल्यानंतर ‘गुगल अकाऊंट ‘मधून ‘पेमेंट आणि सबस्क्रिप्शन’ मध्ये जावे. नंतर ‘पेमेंट इन्फोवर’ क्लिक करून जी-पे हिस्ट्री डिलिट करावी.