आता थांबायचं नाय, फक्त लढायचं; विजयाचा व्यक्त केला निर्धार

0

दादा चा वादा” अजित पवारांचं नवं गाणं रिलीज; स्वभाव आणि कार्यशैलीचं केलं वर्णन

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अजित पवार यांचं ‘दादा चा वादा’ हे नवं गाणं नुकतंच रिलीज करण्यात आले असून सुंदर गुलाबी थीमवर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची ताकद ठेवणारा आणि शब्बाला पक्का असणारा नेता ही अजित पवार यांची ओळख हा या गाण्याचा मुख्य संदेश आहे. या गाण्यात अजित पवार हे समाजातील सर्व घटकांचे पाठीराखे, समर्थक दाखवण्यात आले असून त्यांच्या चारित्र्य, स्वभाव आणि कार्यशैलीचं यात वर्णन करण्यात आले आहे.

 

महिला, शेतकरी, आदिवासी, युवा आणि इतर घटकांसाठी राबवलेल्या योजना आणि कामांची माहितीही या गाण्यातून देण्यात आली आहे. आपण दिलेली आश्वासने पूर्ण करण्यास सक्षम असून समाजाच्या भल्यासाठी काम करत असल्याचा स्पष्ट संदेश अजित पवार यांच्या या गाण्यातून देण्यात आला आहे.

Rate Card

 

आता थांबायचं नाही, लढण्याचा निश्चय करा आणि विजयाकडे वाटचाल करा, असेही गाण्यात म्हटले आहे. हे गाणे कार्यकर्ते आणि समर्थकांना नवी ऊर्जा आणि प्रेरणा देईल.हे गाणं सोशल मीडियावर रिलीज होताच तरुणाईने त्याला भरभरून पाठिंबा आणि प्रेम दिलं. कमेंट करत युवक वर्ग गाण्याचं कौतुक करत आहे. ‘दादा चा वादा’ गाण्यानं पक्ष आणि समर्थकांत एक नवीन आशा आणि उत्साह संचारला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.